ब्रम्हाच्यार्याचा निषेध अभंग
गाथा अभंग २५२
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ध्रु.॥
भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥
तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥३॥
अर्थ :- कपटी माणूस तोंडावर तरतम्याने गोड़ बोलतो. त्याच्या अतःकरणातील भाव माला समजत आहे ।।1।।
अशी फसवेगिरि बरी दिसती काय ? लोकांमध्ये मात्र ती खरी दिसून येते ।।ध्रु।।
भोजनात विष कालवावे तसे तुझे गोड-गोड बोलने आहे. मनात मात्र मारण्याचा मोह आहे ।।2।।
तुकोबा म्हणतात, कपटी माणसाच्या अतःकरणातील कपट दिसून येत नाही. वरवर आदाराचे सोंग दाखवित असतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा