गाथा अभंग २४८
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥
अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥
तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥
अर्थ :-पूर्वज्याणी पुरावुन ठेवलेले गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या हाती आल्यावर त्यामध्ये त्याला सर्प, विंचु, कोळसे दिसतात ।।1।।
जसे काविल झालेल्या मनुष्याला सर्व वास्तु या पिवळ्याच दिसतात ।।ध्रु।।
आपल्याच शरीरा भोवती गोल-गोल फिरल्यास भोवतालचि झाडे, दागडधोंडेही गोल फिरताना आढळतात व् घेरी येते ।।2।।
तुकोबा म्हणतात, पूर्वी केलेले पाप आपल्या कर्माच्या आडवे येते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा