मृदंग पाट्या
गाथा अभंग २३४
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥
तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥
वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥
तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥
अर्थ :- आम्ही शिदोरि मागायला तुझ्या घरी गेलो तर तुझ्या आईने आम्हाला खुप त्रास दिला ।।1।।
ती तुझ्या शिवाय इतरांना काही देत नाही. ओळखीच्या काहि खुणा सांगून सांगून जीव जाण्याची वेळ आली ।।ध्रु।।
फुकटच हेलपाटा मात्र झाला. तुझे घर, तुझी आई यांचा संबंध आम्हाला नाको ।।2।।
तुकाराम माहाराज म्हणतात, हे श्रीकृष्णा, आम्हाला सोडून तू राहतोस म्हणून हे असे होते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा