रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

२१८येइल तें घेइन भागा

गाथा अभंग २१८

येइल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥

आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥

मज घेती डांगवरी । सवें हरि नसलिया ॥२॥

तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥

अर्थ :-माझ्या वाट्याला जेवढे दूध येईल टेवढेच मी घेइन. मी इतरांसारखी आसक्ति ठेवनार नाही ।।1।।

माझी आवड अंगी सदगुण असणार्यांवर अवलंबून आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाचे गुण पाहुन, त्या प्रमाणात भक्तिज्ञान वैराग्याचे दूध देत आहे ।।ध्रु।।

दूध देताना हरिचे जर साहाय्य नसते तर माला सर्वानी काठ्यानी मारले असते ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला राबवून घ्या. कोणतेही काम माला सांगा ती मी करिन ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा