रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

२०७घ्या रे भोंकरें भाकरी

गाथा अभंग २०७

घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥१॥

येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥

माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥२॥

तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥३॥

अर्थ :- भगवंत सवंगद्याना म्हणाले, अरे बाबानो, भोकाराचे लोनचे आणि दहिभात शिदोरि घ्या रे. ज्याच्या जवळ टाक असेल ते दूर फेकावे ।।1।।

येथे जसे द्यावे तसे मिळते. थोडेसे जरी असेल तरी असलेपाहिजे. हे जे मी तुम्हाला सांगतो. ते ध्यानात ठेवा ।।ध्रु।।

माझ्याजवाळ हे जसे आहे तसे तुमच्या जवळचे शुद्ध आहे का हे तुम्ही पहा. नसेल तर घरी जा हे आईला समजून येणार नाही, अश्या प्रकार लोनी घेऊन या ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, घरी माझे कोणीही नाही. तुम्ही मला तुमच्या पायापासून दूर लोटू नका ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा