सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

२४२धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता

मृदंग पाट्या

गाथा अभंग २४२

धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥

ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥

दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥

तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥

अर्थ :- आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरवते, तर मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते ।।1।।

मुलाचे जानातेपन वढु लागले की त्याची समज पाहुन आई त्याच्याकडे ज़रा दुर्लक्ष करते ।।ध्रु।।

दोन्ही मुलांना तिनेच जन्म जिलेला असतो; पन दोन्ही मुलांवर प्रेमात मात्र फरक पडतो  ।।2।।

तुकोबा म्हणतात, प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई राडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा