रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

१९४भीमातीरीं एक वसलें नगर

टिपरी अभंग

गाथा अभंग १९४

भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे ।

तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥

नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।

पुढें गेले ते निधाई जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥

बळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे ।

पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥

संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जया जें पाहिजे तें आहे रे ।

भुक्तिमुक्ति फुका च साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥

दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।

न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥४॥

बहुत दिस होती मज आस । आजि घडलें सायासीं रे ।

तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥५॥

अर्थ :- अरे, भीमा नाधिच्या काठी एक नगर बसले आहे. त्याचे नाव पंढरपुर आहे. तेथील मोकाशाला चार हात सोळा हजार बायका आहे ।।1।।

अरे खेळीया, आपण त्याच्या गावाला नाचत नाचत जाऊ. तो आपल्याला सुख आणि विसावा, दोन्ही देईल. जे पुढे गेले आहेत, ते कालजीपासून मुक्त झाले. त्यांच्या तेथे काळीकाळाला प्रवेश नसतो. पुण्डलिक पातलाने त्याच्याशी कुळवाडि केलि आहे. तो भावदुःख पासून दूर झाला आहे ।।2।।

अरे, संतांनी ही दुकाने घातली. ज्याला जे हवे असेल , ते त्याला तेथे प्राप्त होते, भुक्ति- मुक्ति फुकटच मिळतात ; तरीही त्यांच्याकडे कुणीही पाहत नाही ।।3।।

अरे, पंढरित आषाढ़ी-कार्तिकेत खुप मोठे बाजार भारतात. असंख्य वारकरी तेथे जमतात. ते म्हणतात, आम्ही पंढरी पाहिली आहे त्यामुळे आम्हाला वैकुण्ठ जाण्याची ईच्या नाही ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनाहो, मला खुप दिवस ईच्या होती. ती आता फळाला आली. तुमच्या पुण्याइने त्या पायांची (देवाच्या चरणाची) भेट झाली ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा