शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२६४दया तिचें नांव भूतांचें पाळण

वाथ अभंग २६४

दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥

पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥

तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥३॥

अर्थ :- सर्व जीवांचे पालन करणारी आणि दृष्टांचे निर्दालं करणारी जी आहे, तिचे नाव दया आहे ।।1।।

धर्मनिटीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खून पटली आहे ।।ध्रु।।

अनितीने आचरण, उन्मातपना म्हणजेच पाप आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, अधर्माचरणी लोकांमुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा