रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

२१७वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला

गाथा अभंग २१७

वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥

घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥

सांगितलें केलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥२॥

तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें॥३॥

अर्थ :- भक्तरूपि गाय ही प्रेमाचा पाणा सोडून ज्ञानरूपी दूध देते. तीच्या स्तनांचे दोहन करा, असे कान्होबाने आम्हाला सांगितले आहे ।।1।।

सवंगड्यानो, हे दूध तुम्ही तुच्या हातात घ्या आणि निगुतिने ते वाढा ।।ध्रु।।

कान्होबाने सांगितलेले काम मी केले आहे. हा माझा सत्ता धर्म नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, जून टाकून नवे घ्यावे आणि होणारे त्रास कानी सोसावे ? ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा