गाथा अभंग २१४
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥
काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥
उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥
तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥
अर्थ :- आम्ही तुम्ही गोपाळाच्या संगतित असलो की इतर गोष्टींचा कंटाळा येतो ।।1।।
तुमच्या जवळ काय नाही? तुम्ही सर्वच बाबतीत संपन्न आहात ।।ध्रु।।
तुम्ही कोणत्याही उद्वेगाचा भार घेत नाही. दमलात तरी भरपूर सार मिलते ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, नारायनाने माझे जीवन अधीन करून घेतले ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा