शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२५८सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें

गाथा अभंग २५८

सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥

मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥

वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥

तुका म्हणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥

अर्थ :- कुत्र्याला सोन्याच्या ताटात खीर खायला दिली ।।1।।

मौल्यवान मोत्यांचा हार गाढवाच्या गळ्यात घातला कीव्हा डुकराला कस्तूरिचा सुवास दिला ।।ध्रु।।

एखाद्या बहिर्याला ब्रह्मज्ञान सांगितले तर त्याला ते समजनार आहे का ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे, त्यालाच त्याचे महत्त्व कळणार, भक्ताची योग्यता संतांनाच समजनार ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा