गाथा अभंग २१२
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
येथे जमलेल्या खेलगाड्यांपैकी माझे गाड़ी कोण, ते निवडून वेगळे करा ।।1।।
आपण आपल्या स्वभावाशि जुळणारे एकत्र येवू व एकमेकांशि खेळु ।।ध्रु।।
जे जे भक्तिचा खेळ खेळायला घाबरतात, त्यांच्याशी कादिमोड करा, त्याना खेळातून बाहेर काढ़ा ।।2।।
तूकाराम माहाराज म्हणतात, देवाला भ्याडपनाचा विटाळ नाको ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा