मृदंन पाट्या
गाथा अभंग २३३
नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
अर्थ :- हे गोपाळा, तुझ्या गाई फार ओढाल आहेत. तू आमच्या बरोबर येवू नाकोस ।।1।।
कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥
त्यांच्या मागे मागे सारख्या एझारे कोण घालतो ? कोण धावत जातो ? ।।ध्रु।।
न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥२॥
त्या गाई एकाजागि बसत नाहीत. सारख्या दहा वाटांना उधळतात ।।2।।
तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणों ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फक्त आमची मनरूपी गाय सांभाळ. इतर गाई कश्या सांभाळायच्या, ते आम्हाला ठाऊक आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा