टिपरी अभंग
गाथा अभंग१९३
या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥१॥
फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि सोनियाचा दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥
हिंडती रानोरान भुजंगांत कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥३॥
अर्थ :- सवंगड्यानो, आपण जानते, नेनते कसेही असलो तरी त्वरित परमार्थाचा मार्ग धरु. स्वान्तसुखाय हरिनाम आहे, ते घेत टाळी वाजवु ।।1।।
श्रीरंगाचा जो रंग लाभला आहे, तो प्रेम देणारा पांडुरंग आहे ।।ध्रु।।
कित्येक साधक रानावानात आम्हाला गाताना, नाचताना अत्यंत सुख प्राप्त होते ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, जे ब्रम्हादिकांना दुर्लभ आहे ते श्रीकृष्णचे सावळे रूप ! परंतु कीर्तनात त्याचे नाव घेतले की फुकटच लाभते आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा