टिपरी अभंग
गाथा अभंग १९२
दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे ।
कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥१॥
कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे ।
सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥
संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे ।
हात राखोन हाणिती टिपर्या । टिपरें मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥
विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे ।
निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥
प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे ।
नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥
रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे।
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥
अर्थ :- दोन तिपर्यांचा अघात एकाच नाडा ही निर्मिति करतो. तसेच हरिच्या निर्गुण आणि सगुन या दोन्ही रूपांत भेद नाहीच . कलाकार अनेक कौशल्य सादर करतो. शेवटी ती एक कलाच असते ।।1।।
अरे कोणतीही गोष्ट फुकट जात नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा