रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

१९१बाराही सोळा गडियांचा मेळा

टिपरी अभंग

गाथा अभंग १९१

बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।

जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥

नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ध्रु.॥

सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे ।

विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥

आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे ।

आंधळ्यासि डोळे पांगळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तारुण्यें रे ॥३॥

अर्थ :- टिपरीच्या खेळात बारा किंवा सोळा संतरूपि गद्यांचा आपण मेळ जमवु. भगवंत हा सेतरावा गाड़ी आहे. तिपर्यांच्या नादात तालबद्ध पदे राखु. मृदुंगातून ध्वनि निघत आहे ।।1।।

अरे, आपण खेळत, नाचत पंढरीला जाऊ. विठ्ठल-रूखुमाइचे दर्शन घेऊ रे ।।ध्रु।।

चार वेद, सहा शास्र, अठरा पुराने यांत वर्णन केल्यापेक्षा ते वेगळे आहे. त्याला गाऊ. भजन छंदात ताळ्या वाजऊ. अश्या आनंदात पक्षी चारा खाने विसरतात, तरुनवर्गहि देहभान विसरतो ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, तेथे असा आंनद असतो की, त्यात मुका बोलू लागतो. बहिरा एकु लागतो. आंधल्याला दृष्टी प्राप्त होते. पांगल्याला पाय येतात. वृद्ध लोक तरुण होतात रे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा