रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

१९०एके घाई खेळतां न पडसी डाई

टिपरी अभंग

गाथा अभंग१९०

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥

खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।

तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ध्रु.॥

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई ।

तेणें सतत फड जागविला रे । एक घाई खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥२॥

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला ।

आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकी च घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥३॥

रामा बसवंत कबिर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा सवंगडियां एकचि घाई ।

तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळ निवडिला रे ॥४॥

ब्राम्हणाचा पोर खेळिया एक भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां ।

तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एक चि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥५॥

आणीक खेळिये होउनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा ।

पुढिलांची धरूनियां सोई रे । एक चि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥६॥

अर्थ :- अरे भाई, एक्याभाव मणि धरून कोणताही खेल खेळशील तर संसाराच्या दावात पडणार नाहीस. दूर राहिलास तर फसशील. त्रिगुणाच्या फेऱ्यात तू अङ्कलास तर फार दुःखी होशील. तसे होउ नये म्हणून च्यार वेदानी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब कर ।।1।।

अरे भावा, खेळ खेळून अलिप्त रहा. विषयचा संग टाकून दे. या खेळानेच तू समर्थ होशील. माझे बोलने सत्य आहे, हे ध्यानात ठेव ।।ध्रु।।

शिमप्याचा पोर नामा-असाच खेळ खेळला . बलवान अश्या विठ्ठलाला त्याने आपलेसे केले. आपल्या सवंगड्यांना शिकवुन फड़ सतत जागता ठेवला. एक्य भावनेने खेळत असतांना तो कुठेच् चुकला नाही. सर्व संतानी त्याला सन्मान दिला ।।2।।

ज्ञानदेव, मुक्ताबाई, वटेश्वर, चांगा, सोपान हे आनंदाने खेळ खेळले रे! यानी गुराखि कृष्णला पुढारी बनविले आणि सर्वजन त्याच्याभोवती फहरी धरून नाचले. ब्रम्हादिक देव त्यांच्या पाया पडतात रे ।।3।।

रामा बसवंत, खेळाडू कबीर यांची चांलि जोड़ी जमली. तेथे भजनाचा सुंदर नाद जमला रे! ब्रम्हादिक देवांनी मिळून हाच खेळ निवडला ।।4।।

ब्रम्हणाचा पोर एकनाथ हा एक चांगला खेळ निवडला. त्याने सर्वाणांच् खेलकरि बनविले. जनार्दन, बसवंत याना पुढे करूँ त्यानी वैष्णवांचा मेळा जमविला. एक्य भावाने खेळ खेळला आणि आपण स्वत: पुढारी झाला ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, वर्णन करण्यास माझी वाच्य समर्थ आहे. अरे गड्यानो, पुढे गेलेल्यांची सांगत धरून पुढे हुश्यारीने खेळा. एक्य भावाने जो खेळ खेळन्याचे चुकल, तो संसाराच्या जाळ्यात सापडेल रे! ।।6।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा