टिपरी - अभंग ७
गाथा अभंग१८९
खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥
वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥५॥
अर्थ :- एकदा वैष्णवानी प्रेमभावनेनि वाळवंतात एकयभावाचा खेळ मांडला आहे. सर्व वैष्णव त्या खेळात दंग होऊन नाचू लागले. क्रोध, अभिमान हेसारे पायाखाली तुड़वुन एकमेकांच्या चरणावर तर डोके ठेवत आहेत ।।1।।
ते पवित्र नामावली गात आहेत. आनंदाने उड़या मारित आहेत. त्यांनी जनि काळिकाळाला जिंकन्यासाठी कंबर कसली आहे. ते एकापेक्षा एक शुर वीर आहे ।।ध्रु।।
त्यानी अंगाला गोपीचंदन लावले असून गळ्यात तुळशीच्या माळा घातलेल्या आहत. गळ्यात हार मिरवित आहेत. टाल, मृदुंगाचा घोष, फुलांचा वर्षाव होत आहे. उपमा देतायेणार नाही असा सुखसोहळा आहे हा ।।2।।
भजनाच्या नादात लुब्ध होऊन मुठ, स्त्रिया, पुरुष, पंडित, ज्ञानि, योगी, महानुभवि, सीद्ध, साधक या सार्यांना एकच समाधि लागली आहे ।।3।।
वर्ण, जात यांचा अभिमान विसरून, जात-पात विसरून ते सारे एकमेकांना लोटांगण घालित आहेत. त्यांचे मन लोन्यासारखे निर्मल आहे. पाश्यानवृदायी मांसालाही पाझर फुटनारे दृश्य आहे रे! ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, येथे होत असणाऱ्या जय घोश्यामुळे आकाश गरजत आहे. वैष्णव, वीर सारे भजनात दंग झालेले आहेत. भवसागर तरुण जाण्यासाठी त्यानी ही सोपी पायवाट केलि आहे ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा