हाल अभंग
गाथा अभंग १८८
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥
तुझ्या राहिलों आधारें । जालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥
तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥२॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥
अर्थ :- मी कामामुळे घरात त्रासुन गेलो आहे . माया मला जन्ममृत्यूच्या दारात सारखी मारत आहे, तिला जराहि माया-दया नाही ।।1।।
तुझ्या आदाराने राहिलो; त्यामुळे सर्वत्र चांगले झाले आहे ।।ध्रु।।
तुझ्या संगतिला राहिलो म्हणून काकुलतीला आलो आहोत ।।2।।
तुकाराम महाराज महानता, हे कान्होबा, तुझ्या भिड़ेमुळे आमची पीड़ा दूर गेली ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा