रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

१८७तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति

हाल अभंग

गाथा अभंग १८७

तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१॥

नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥

घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥

तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥

अर्थ :- हे भगवंत तुझ्या संगतिमुळे अंतःकरन अगदी निश्चिंत झाले आहे. कसली काळजी राहिलेली नाही ।।1।।

जे कधीही अनुभवले नव्हते,ते सुख आता आम्ही आनुभवले ।।ध्रु।।

घरात ताकाचे सरोवर आहे; तर येथे लोन्याचा पुर आला आहे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, आता जरी तू आम्हाला हकलुन लावलेस तरीदेखिल आम्ही येथून जाणार नाही. तुझ्याच सहवासात राहणार ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा