हाल अभंग
गाथा अभंग१८६
म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥१॥
चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं । गाई जमा करूनि ॥ध्रु.॥
न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥२॥
तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥३॥
अर्थ :- गोपाल म्हणतात, आमचे पोट भरले; आता आम्हाला शिदोरिचि गरज नाही. या देवाला आम्ही क्षणभरहि विसरणार नाही ।।1।।
कान्होबा, चल-चल- रे आपण राणात खेळ मांडू. गाई जमा करून त्याना गोठ्यात बसवु ।।ध्रु।।
आता घराकडे जाण्याची गरज नाही. घराच्या एरझारया आता संपल्या. तूच आमचा मायबाप, उत्तम सयरा सारेकाहि आहेस ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, एकदा पोट भरले की कशाला बोभाटा करायचा? मग माघे पुढे पाहणे संपलेच ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा