हाल अभंग
गाथा अभंग १८५
वळी गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥
नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥
नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघें चि बरें ॥२॥
तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥
अर्थ :- इतरत्र धावांर्या गाईंना हरी वळवितो. आमच्या घरी फेऱ्या मारतो ।।1।।
'कान्होबा' असे महंताच तो जवळ येवून उभा राहतो. तो अतिशय बलवान आहे ।।ध्रु।।
आम्हाला तो काही कमी पडू डेत नाही. 'तुमचे सर्व ठीक आहे ना ?' असे विचारतो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, तो आमच्या अंत:करणापासून दूर व्हावा असे आम्हाला वाटतच नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा