हाल अभंग
गाथा अभंग १८४
घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥१॥
ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ध्रु.॥
स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥२॥
मोहरी पांवा काठी । तुका म्हणे यांजसाठी ॥३॥
अर्थ :- गंगेच्या पाण्याच्या आवाजाबरोबर गोपाळ हुंकरु लागले. त्याचे श्रीकृष्णाने समाधान केले ।।1।।
गोपाळांची त्याला इतकी सवय होती की, ते जिकडे जातील तिकडे तो त्यांच्यामागे धावत जाइ ।।ध्रु।।
बासरी वाजून त्याने गंगेला शांत,स्थिर केले आणि म्हणाला, 'गंगे, आता चालु लाग, त्याच्या बरोबर गंगा धावु लागली ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, चरचराला मोहरूँ ताकन्यासाठी देवान मोहरी, पावा, काठी धारण केलेली आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा