हाल अभंग
गाथा अभंग१८३
बहु बरा बहु बरा । यासांगातें मळि चारा ॥१॥
म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥
बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥२॥
पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥३॥
अर्थ :- हा श्रीकृष्ण फारच चांगला आहे. टीच्या संगतिमुळे गुरांना चारा मिळतो. आम्हालाही खाऊ मिळतो ।।1।।
यासाठी कान्होबाला जिव अर्पण केला व त्याच्या बरोबर राहिलो ।।ध्रु।।
हा खुप सुंदर आहे, त्याचा सहवास थोडासाजरी झाला तरी तो चांगला वाटतो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, याची संगती पुनःपुन्हा करण्यास मी सोकावलो आहे आणि इतराना पण सोकावित आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा