शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

अभंग ०८

अभंग ०८

सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥

तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥

पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥

तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥

तुकाराम महाराज दोन वेळा सवध झालो, सवध झालो असे म्हणून हरिच्या जागराला आलो।।1।।

नाम साधनेच्या आड़ येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे।। ध्रु।।

तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून, हरी भजनांची गर्जना होत आहे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, की त्या ठिकाणी हरीकृपेची छाया वळते ।।3।।

राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा