मंगलाचरण अभंग ३
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
अर्थ:- हे रुखुमाइच्या पतिपरमेश्वरा, माझ्या डोळ्यात सतत तुझी मूर्ति जडून राहुदे ।।1।।
हे देवा, तुझे रूप गोड आहे. तसेच तुझे नामही मधुर आहे. त्याविषयी मला नेहमी प्रेम वाटुदे ।।ध्रु।।
हे विठु माउली ,मला हाच वर दे की माझ्या हृदयात तू नेहमी प्रवेश करून राहावे ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या पायापाशि सर्व सुख आहे. मला तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टिविषयी ईच्या वाटू देऊ नाकोस. माझे दूसरे काहीच मागने नाही।।4।।
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
।आपला दिसव गोड असो।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा