१७९
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥
काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥
वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥
तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाडे ॥३॥
अर्थ :- कृष्णनामरूपि मणि आम्ही आमच्या गळ्यात धारण केलेली आहे. त्यामुळे सर्वत्र प्रकाश पसरलेला आहे ।।1।।
हा एकयकाला आता सर्वाना समारभपूर्वक मोठ्या उत्साने सर्वाना वाटून टाकू ।।ध्रु।।
ब्रम्हादिक असे तुत्तमलोक आहेत, तेथिल लोकांना आपण हा काला दाखवुन वाकुल्या दाखवु ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, या विश्वात आम्ही वैष्णव वीर, बलवान आहोत ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा