रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

१८१कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे

हाल अभंग

गाथा अभंग १८१

कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥१॥

वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥ध्रु.॥

ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥२॥

तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥३॥

अर्थ :- कान्होबा, आता तुम्ही आणि आम्ही खेलगडी. आता आपल्याकडिल भाव दुसरीकडे जाऊ द्यायचा नाही ।।1।।

तुझ्या शिदोरिचा भार मी वहिन,  गाई वळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही ।।ध्रु।।

ढवल्या गाईचे दूध काढू,  तर नाठाळ, स्वैर बुद्धिरूपी गाइला ठोसर मारू ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, जे तुझ्या बोलन्याला मानत नाहीत, त्याना तुझ्या तोंडाकडे पाहायला नको लावू ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा