शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

१७६ तुम्ही गोपी बाळा मज कैशा नेणा

१७६

तुम्ही गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥१॥

इंद्र चंद्र सूर्य ब्रम्हा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥

मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥२॥

तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥३॥

अर्थ :- श्रीकृष्णाने गोपीना त्याच्या स्वरूपाचे विषद करून सांगितले. इंद्राला अमर करणारा मीच आहे ।।1।।

आणि इंद्रासह, सूर्य, चंद्र, ब्रम्हांड आणि तिन्ही लोकांचा निर्माता तो स्वतः असल्याचे सांगितले ।।ध्रु।।

हे रहस्य प्रतक्ष परमेश्वराकडून  ऐकणाऱ्या गोपिका किती भाग्यशाली! ।।2।।

तुकोबा म्हणतात, माझा जन्म मात्र दगडाप्रमाने फुकट गेला. गोपिकांच् भाग्य मला लाभला नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा