शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२५९ऐसा हा लौकिक कदा राखवेना

गाथा अभंग २५९

ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥

संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥

आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥

संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥

धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥४॥

बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥

भेटिसि न वजातां म्हणती हा निष्ठ‍ । येतां जातां घर बुडविलें ॥६॥

लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥

निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥

लोक जैसा लोक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥

तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥

अर्थ :- संतपदाचा लौकिक सदासर्वकाळ सांभालने शाक्य होत नाही ।।1।।

प्रपंच करताना हां स्वार्थी दोषी आहे आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे तर हा अळशी आहे, असे लोक म्हणतात ।।ध्रु।।

धर्मा प्रमाणे आचानर केले तर दांभिक म्हणतात, नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात ।।2।।

संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात, नाही केला तर हा अभागी आहे, याला संत सहवास, शास्त्राभ्यास घडनार नाही असे म्हणतात ।।3।।

दरिद्री माणसाला कमनाशिबि म्हणतात, तर श्रीमंताला अहंकार फार आहे, असे म्हणतात ।।4।।

बोललो तर बड़बड़ करणारा आणि नाही बोललो तर गर्विष्ट म्हणतात ।।5।।

नातेवाइकाना भेटन्यास नाही गेलो तर निष्टुर आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो एशे म्हणतात ।।6।।

लग्न करू पाहता मस्तिला आला म्हणतात आणि लग्न न करता राहीला तर 'नपुंसक' म्हणतात ।।7।।

निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवडा वाढला म्हणतात ।।8।।

लोक हे असे दोन्हीकडून बोलतात, जाशी ओकारी थांबवता येत नाही तशे लोकांचे बोलनेही थांबवता येत नाही ।।9।।

म्हणून तुकोबा म्हणतात, की लोकांच्या बोलान्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा ।।10।

1 टिप्पणी: