शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

२९१मन करा रे प्रसन्न

गाथा अभंग २९१

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥

मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥

साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥

अर्थ :- मानवी जीवनातील ईच्या-आकांक्षा, सुख-समाधान, मोक्ष, सर्व सिद्धि मिळविन्याचे प्रमुख साधन म्हणजे प्रसन्न, समाधानी मन होय ।।1।।

मनानेच देवाची स्तपना करून त्याची मानस पूज्या कली असता सर्व ईच्या पूर्ण होतात; कारण मन हे मातेप्रमाने आहे ।।ध्रु।।

मानाचा गुरु आणि शिष्य , दास-दासी आहे, प्रसन्न मन परमार्थात रामल्याने मोक्ष लभतो; पण उद्विग्न असेल तर अधोगति ठरलेली आहे ।।2।।

हे साधका, वाचका, पंडित, विद्वान, लोकाहो, समाधानी मांसासारखे दूसरे दैवत नाही, असे तुकोबा म्हणतात ।।3।।

३ टिप्पण्या:

  1. समाधानी मांसासारखे ऐवजी समाधानी माणसासारखे दुरुस्त करावे.

    उत्तर द्याहटवा
  2. तुम्ही छान काम केले आहे सर्व अभंग मिळतात. सुची वगैरे तयार केली आहे का कि ज्यामुळे अभंग पाहण्यासाठी होईल. ७३५०७०५०९१

    उत्तर द्याहटवा