सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३१५वेदाचें गव्हर न कळे पाठकां

गाथा अभंग ३१५

वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥

विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥

जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥

तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥

अर्थ :- वेदपथं करणाऱ्या सर्व पंडिताना वेदाचा सार कळतेच अस नाही, इतराना वेद पाठनाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार काळण्याचा संबंधच येत नाही ।।1।।

विठ्ठलाचे नाम हे सुलभ-सोपे आहे, भवसागर पर करणारे आहे, ते घेण्याचा अधिकार सर्वाना आहे ।।ध्रु।।

मंत्रतंत्र जानाणाऱ्या जानाकारांना कर्मकांड परिपुर्नरीत्या साध्य होत नाही, तर इतराना कसे समजनर ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, वेदांमधील विधिनीशेष लोप पावल्यामुळे हां मार्ग खुंटला आहे, त्यामुळे कलियुगात नामभक्तीवीना दूसरा पर्याय नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा