सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३२०बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों

गाथा अभंग ३२०

बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥

भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥

विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥

सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥

गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥

तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥

अर्थ :- बारे झाले देवा, तू मला कुनबी मातीत जन्माला घातलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या गर्वाने मेलो असतो ।।1।।

थोर केले नाहीस हे बारे झाले, आता मी तुझ्या पायाशि नाचू शकतो ।।ध्रु।।

माझ्याजवाल कोणतीही विद्या असती तर माला अहंकार झाला असता ।।2।।

तय अहंकारामुळे माझ्या हातून संतासेवा घडली नसती आणि हां नरदेह वाया गेला असता ।।3।।

त्या विध्येच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व, ताठा आला असता; त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालु लागलो असतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, थोरापनामुळे अभिमान, अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य अंती नरकात जातो ।।5।।

#रामकृष्णहरि_विठ्ठल_केशवा

1 टिप्पणी: