सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३०१माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज

गाथा अभंग ३०१

माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥

कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥

अर्थ :- एखादी गोष्ट 'माझी' आहे, ऎसे म्हणताना तुला लाज कशी रे वाटत नाही ? कन्या, पुत्र, धन संप्पत्ति सारे माझे आहे, असे म्हणणे म्हणजे वेडेपना नाही काय ? ।।1।।

सारे नातेवाईक किंवा धन- संपत्ति आपल्याला कालपुरुषयाच्या तावडीतून सोडवू शकत नाही. भगवंत हाच फक्त खरा आहे. बाकी काही खरे नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, या चांडालाना किती वेळा सांगावे, की असे जीवन का घालविता? ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा