सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३१६विधीनें सेवन । विषयत्यागातें समान

गाथा अभंग ३१६

विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥

मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥

बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥

तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥

अर्थ :- शास्त्रार्थाचे सेवन योग्य त्या विधिने केले तर ते विषय त्यागासमान आहेत ।।1।।

जन्मापासून अंतापर्यंत हरिचे नामस्मरण हाच मानवजन्माचा धार आहे ।।ध्रु।।

भक्तिमार्गाचा तर्क काढत गेल्यास अनेक वाता फुटतील ।।2।।

तुकोबा म्हणतात, म्हणून मनुष्याने परमेस्वरावर श्र्द्धा ठेवली तर तो त्याचे कल्याण करील ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा