सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३१२एकादशीस अन्न पान

गाथा अभंग ३१२

एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥

ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥

अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥

सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥

आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥

तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥

अर्थ :- एकादशिला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे ।।1।।

या एकाढशि वृताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत ।।ध्रु।।

एकादशिला जो पाण्याचा विडा खाइल त्याने विटाळशीचा स्ताव खाल्ल्याप्रमाने होईल. त्याला काळ खाऊन टाकल ।।2।।

या वृताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जड़तील ।।3।।

या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरानाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पाप्राशिपुढे मेरु पर्वतही लहान वाटतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही त्याना यमदूत यातना मई शिक्षा देतो ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा