सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३०९एक तटस्थ मानसीं

गाथा अभंग ३०९

एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥

दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥

एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥

एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥

एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥

वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥५॥

अर्थ :- एक व्यक्ति नामस्मरण भक्ति करतांना तटस्त बसली आहे, तर दूसरी व्यक्ति आलसामुळे तटस्त बसली आहे ।।1।।

अश्या दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्ता एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतिल फरक जानकाराला कळेल ।।ध्रु।।

एक भगवंत चिंतना करता डोळे मिटुन ध्यानस्त बसतो आणि दूसरा बसून  झोप घेतो ।।2।।

एक सर्वस्वाचा त्याग करुण साधू होतो, तर दूसरा पोट भरण्यासाठी साधू होतो ।।3।।

एकजण देवासाठी भक्ति करतो, तर दूसरा पोटासाठी बक्ति करतो ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा