सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३०८अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव

गाथा अभंग ३०८

अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥

नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥

जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥

तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥

अर्थ :- सर्व चराचर सृष्टिमध्ये परमेस्वर भरून राहिला आहे, म्हणजे तो पाषाणाच्या धातुच्या मूर्तिमध्ये असनाराच ना! ।।1।।

पाखंड किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग ? ।।ध्रु।।

संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती नास्तिकांच्या मनी नसल्यामुळे त्याना सांत्वचनाचे महत्त्व कळणार नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, संत सगुणभक्तिचा अनुभव नास्तिकाणां नसल्यामुळे ते सगुन भक्तिचा निषेध करतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा