सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३१३करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे

गाथा अभंग ३१३

करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥

शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥

आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥२॥

देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥

तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥४॥

अर्थ :- एखाद्या व्यक्तिने दुसर्याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो पुण्याच्या वातेकरि होतो, पण व्रत मोडले गेले की ते दोघेही नरकात जातात ।।1।।

सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केलि की मांसन्नमान मिळतो, चोरांची संगती केलि तर शिक्षा मिळते  ।।ध्रु।।

आपल्या जावाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये , आपले हित ओळखावे ।।2।।

सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वारानाशिला जाण्यास मदत करावी-पण चोराला चंद्रबळा  (चोरीची वेळ) सांगू नये ।।3।।

तुकोबा म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्ञयाग हे भक्तिमार्ग आहेत. हे कढ़ी सोडु नये ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा