सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

२९७कोणें तुझा सांग केला अंगीकार

गाथा अभंग २९७

कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥१॥

कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥

तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥

कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥३॥

तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥

अर्थ :- तुझा कोणी अंगीकार केला की, तू त्याला थोर मानतो ।।1।।

विठ्ठालाला शरण जावु नको, म्हणून तुला कोणी उपदेश केला आहे का ? ।।ध्रु।।

जेव्हा यम समोर येईल तेव्हा तुला कोण पाठीशी घालेल ।।2।।

काळ क्षणाक्षणाने तुझे आयुष्य खात आहे; त्यामुळे तुझे बळ दिवसेंदिवस कमी होत आहे ।।3।।

तुकोबा म्हणतात, आशा नास्तिकाला कोणीतरी परमेस्वराची अठावन करुण दया ; कारण तो त्यालाच विसरला आहे ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा