सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३१४इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग

गाथा अभंग ३१४

इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥

अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥

अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥

तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥३॥

अर्थ :- पंढरी क्षेत्र ही भक्तांच्या इनामदारीची पेठ आहे, त्याचे सर्व मार्ग भक्तानि भरून वाहत आहेत ।।1।।

मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारि पुरुषार्थ स्वरुप या पेठेत विकावयास आले आहेत, त्याचा लाभ होण्याचे शुभ शकुन होत आहेत ।।ध्रु।।

या पेठेतील व्यापार्याच्या सर्व समश्या दूर झाल्याने देने-घेणे सहजसोपे झाले आहे ।।2।।

तुकाराम महाराज महाजतात, या पेठेत् येणाऱ्या भक्तानां आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा