सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

२९५शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति

गाथा अभंग २९५

शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥

म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥

सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥

तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥३॥

अर्थ :- जो सहा सास्रांचे सार आणि वेदांची साक्षात मूर्ति आहे, तो आमचा सांगाती, प्राण सखा आहे ।।1।।

म्हणून आम्हाला इतरांची पर्वा नाही; कारण नामस्मरनाने आमचे सर्व चांगले झाले आहे ।।ध्रु।।

राज्य रूप सगुन-निर्गुण आहे, तो आम्हा (भक्त) बरोबर नेहमी क्रीड़ा करतो ।।2।।

तुकोबा महानता, आम्ही (भक्त) जन्मदात्यांचे जन्मदाते आहोत, स्वयंभू आहोत ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा