सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

२९६ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं

गाथा अभंग २९६

ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥

थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥

पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥

न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥

अर्थ :- भगवंताच्या महिमा ऐसा आहे, की तो भिल्लिनिचि उस्टि बोरे आवाडीने खातो ।।1।।

त्याला प्रेमाचा दुष्काळ भासतो, तो भक्तांच्या प्रेमाचा भुकेला असतो ।।ध्रु।।

सुडाम्याचे कोरडेच पोहे फकी मरून चवीने खातो ।।2।।

तुकोबा म्हणतात, भक्ताने उष्टे आणले आहे, की थोड़ेसेच आणले आहे, हे तो पाहत नाही; तर त्याचा भक्तिभाव पाहतो ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा