सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३००मृगजळा काय करावा उतार

गाथा अभंग ३००

मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥

खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥

मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥

स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥

सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥

अर्थ :- मृगजलाची नधि पार करण्यासाठी पायउतारा व्हावे लगत नाही ।।1।।

खपरच्या खोट्या पैश्याने मुले खळतात , त्यात खरोखरचा आर्थिक लाभ हानी नासते ।।ध्रु।।

लहान मूली बाहुला-बाहुलीचे लग्न करतात; पण त्यात खरे नाथे जोडले जात नाहीत ।।2।।

स्वप्नातील सुखदुःखाशी जागृतिमधील जीवनातील काहीही संमंध नसतो ।।3।।

खेळाच्या पतावरि सोंगत्या मरतात, जगतात हे सर्व जसे खोटे असते, तसेच बध्दता, मुक्तता हे शब्द आत्म्याला लागू पडत नाही, असे तुकोबा म्हणतात ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा