सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३१०काय कळे बाळा

गाथा अभंग ३१०

काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥

आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥

देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥

तुका म्हणे भावें । माझ्या मज समजावें ॥३॥

अर्थ :- लहान मुलाला आपला बाप श्रीमंत आहे की गरीब आहे हे कळत नास्ते ।।1।।

आपल्याला एखादी वास्तु देने शाक्य होईल की नाही हे त्याला समजत नसते ।।ध्रु।।

एखादि वस्तु पाहिली की हत्ता करुण ती घेणे एवढेच त्याला कळते ।।2।।

तुकोबा म्हणतात, माझ्या मनातहि विठ्ठला प्रती असाच भाव आहे. तो त्याने समजून घेऊन, मला जाणावें ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा