गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३७एका गा ए भाई

सरवदा - अभंग १

  ४३७

एका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची ।

ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥

आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती ।

हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥

आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें म्हणोन । पडिलें खान तया घरीं ।

म्हणोन न म्हणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होईल तई । चोराठायीं विश्वास ॥२॥

आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं ।

पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनावी निश्चिती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥३॥

एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो तुका म्हणे आई ।

येथें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥४॥

भावार्थ :-   हे बंधुंनो, शकुना सांगणारा काय संगत आहे, ते ऐका! तुमच्या वाड्यात (देहात) ऐक आई आहे (अंत:करण) आहे. तिला दोन पुत्र आहे. ते म्हणजे काम आणि क्रोध. ते आपल्या आईची विटंबना करतात. विटंबना करणार हे तर सर्वाना माहीतच आहेत. शहाण्या माणसाने प्रथम “काम’ मारून टाकला पाहिजे. त्याशिवाय त्याला सुख लाभणार नाही, हे लक्षात घ्या ॥१॥

बंधूबगिनिंनो,  सरावादा काय संगत आहे ते नित ऐका. देह खरा आहे, असे मानणारा कुंभीपाक नरकात जातो. हे माझे म्हणणे चारचौघांकडून पडतालुन पहा. देह खोटा आहे. क्षणभंगुर आहे, असे सांगा म्हणजे तुमची सारी दुखे दूर होतील ॥ध्रु.॥

सरवदा संगत आहे, कि माझे मन सदैव जागे आहे, असे म्हणनार्याकडे कधीही चोरी होणार नाही. खुशाल निज्रुपात असावे. या चोरावर विश्वास ठेवला तरच काहीतरी प्रयत्न करता येतील ॥२॥

आणखी ऐक महत्वाचा प्रकार सरवदा संगत आहे. पाचाच्या हाती दिलेली पतिव्रता दु:खी होईल म्हणून स्वस्त राहू नये. भगवंताच्या ठिकाणी जर टी रत झाली तर सुखाची गती तिला प्राप्त होईल ॥ध्रु.॥

तुकाराम महाराज म्हणतात, सरवदा आणखी ऐक प्रकार संगत आहे. तसे तू कर. दान देताना जो दूर राहतो, तो चांगला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठाई, तुमचे नाव काय आहे हे सांगा ! मालाचा सांगा, नाहीतर भलत्या ठिकाणी संहाल, जेथे ते अधम आहेत; ते नाश पावोत ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा