गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४७सुंदर मुख साजिरें

४४७

सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ।

विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥

अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी । मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो ।

कोटि रविशशिप्रभा । लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥

सावळी सकुमार । गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो ।

कटीं क्षुद्र घंटिका । शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी । अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥

अष्टांगें मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली । सुगंध लावण्यखाणी वो ।

सर्वकळासंपन्न । मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली । आदिशक्ति नारायणी वो ॥३॥

घटस्थापना केली । पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला । तिन्ही ताळांवरी वो ।

आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा । कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥

तेहतिस कोटि देव । चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या । करिती पुष्पांचा वरुषाव वो ।

नारद तुंबर गायन । ब्रम्हानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें । तुकयाचा बंधव वो ॥५॥

अर्थ :- माझ्या विठाईमातेचे  मुख अतिशय सुंदर आहे. कानातील कुंडले मनोहर, सुंदर आहेत. तिची वेणी नागमोडी आहे. तिच्या कपाळावर केशर-कस्तुरीचा माळवट भरलेला आहे, विशाल अश्या नेत्रानी ती तिरप्या नजरेने पाहत आहे. तिच्या गळ्यात वायजयंतीमाळा  विराजत आहे. तिने पितांबराची कास घातलेली आहे. सुगंधी चंदनाची उटी अंगाला लावलेली आहे ॥१॥

 

अशी अत्यंत रूपवान देवी गोंधळाला आली आहे. ती अतिशय तेजस्वी असून,कोतीचंद्र सुर्याउतक्या तेजाने सर्वांना दिपून टाकले आहे.  तिच्या अनुपम लीला अनाकलनीय आहेत. ब्रह्मदिकानाही समजत नाही ॥ध्रु.॥

 

माझी विठाई सावळी, सुकुमार आहे. तिच्या चारही भुजा शोभिवंत आहेत. वक्षस्थळ सखोल आहे; त्यावर सुवान्पादक झळकत आहे. तिच्या कमरेवरील लहान घुगारामुळे गोड ध्वनी बाहेर पडतो. तिच्या पायातील घागार्या वाजत असून, ती सुंदर गाणी म्हणत, नृत्य करीत आहेत ॥२॥

 

तिच्या अष्टांग सुंदर रूपाचे काय वर्नन करावे ! शुद्ध रसाची मुर्ती ओतावी, तशी ती दिसते. ती सुन्दार्याची खान आहे. सकाळ गुनामंडीत असून, सदा हसतमुख असते. कोमल, मृदू वाणीने ती बोलते, ती आदिशक्ती नारायणी आहे. अनेक रूपांनी ती नटलेली आहे ॥३॥

 

पंढरपुरी क्षेत्री तिची घातास्तापाना केली आहे. त्रैलोक्यावर आकाशाचा मंडप उभारला आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात विठीने गोंधळ मांडला आहे. भक्ताच्या कार्यासाठी कृष्णाई जोगेश्वरी आली आहे ॥४॥

 

तसेही कोटी देव, आठ कोटी भैरव यांचा मेळ जमला असून, आरत्या ओवाळल्या जात आहेत. फुलांचा वर्षाव करीत आहेत. नारद-तुंबर आनंदाने गात आहेत. गंधर्व ब्रह्मामानंद साजरा करीत आहेत. तुकयाबंधु तिच्या चरणांना वंदन करीत आहेत ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा