शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

४५९सातें चला काजळ घाला तेल फणी करा


४५९

सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥

या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥

अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥

तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥

अर्थ :- बायांनो, डोळ्यात ज्ञानाचे काजळ घाला. हरिविषयीच्या स्नेहाचे तेल लावा. पश्चात्तापाच्या फनीने अंत:करणातील सारे विकार विचारून काढा व बुद्धीची वेणी नित बांधा. आता पंढरीच्या परामार्थबाजारात नाचायला चला. आताच संतरूपी दिवाण घरी घेऊन गेले. ते पारावर बसले आह्रेत. त्यांच्यापुढे फेर धरून नाचूया ॥१॥

 

या साहेबांकडून आपण ज्ञानदानाचे कर्ज घेतलेले आहे, त्याच्या पुढे नाचून ते फेडून टाकू म्हणजे पुन्हा ते वेळोवेळी द्यायला नको. साहेब प्रसन्न होतील म्हणजे आपल्याला संसाराच्या बाजारात पाट्या घेऊन दुकाने फिरावी लागणार आहित ॥ध्रु.॥

 

आपण सार्याजनी आपला धनी जो पांडुरंग, त्याच्या समोर नाच करुया ! तेथे ऐक ठिकाणी सुख सामावले तर हा चाळा कशासाठी ? ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, एकाची सेवा कारावी आणि माया तोडावी. त्याला साधून मुल ठिकाणी जाऊया ॥३॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा