गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५२आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा

कावडे

गाथा अभंग ४५२

आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥

नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥

तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
 

अर्थ :- देहावरील अहंता सोडून जे उदासीन झाले आहे, त्यांना मी नमन करतो. जे देवाला आळवित, त्यांना मी नमन करतो ॥१॥

 

तीर्थक्षेत्री जाणाऱ्यांना माझा नमस्कार असो ॥ध्रु.॥

 

जे संतवचनांवर विश्वास ठेवतात, ज्यांनी गुरुचे दास्यत्व पत्कारले आहे, त्यांना नमन असो ॥२॥

 

जे मात्या-पित्यांचे आज्ञांचे पालन करतात, जे सत्यभाशी आहेत, त्यांना वंदन असो ॥३॥

 

उताराचे सुखदु:ख जे जाणतात, दुसर्याच्या ताहान-भुकेची ज्याना जाणीव असते, त्यांना वंदन असो ॥४॥

 

जो परोपकारी, पुण्यवंत आहे, ज्यांच्या इंद्रीयांवारती ताबा आहे, त्यांना माझा नमस्कार असो ॥५॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या दासांना माझा नमस्कार असो. त्यांच्या सहवासात सर्व इच्छया पूर्ण होत असतात ॥६॥

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा