गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५१आहा आहा रे भाई

४५१

आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ।

पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥

यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।

पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि म्हणा रे ॥२॥

नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ।

नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरि म्हणा रे ॥३॥

हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।

विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥

तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।

या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥

अर्थ :- अरे बंधुंनो, सत्प्रवृत्तीने चालणार्या यातेरेकारुंना द्नानाचे भोजन देण्यासाठी हे सत्र घातले आहे. सर्व मार्ग या मार्गाला येऊन मिळतात. सर्वांचे मनोरथ पुरविण्यासाठी हे इच्याभोजन घातले आहे ॥१॥

 

जे कोणी येथे येतील ते तृप्त होतील. हे कधीही न संपणारे असे भोजन घातले आहे. मात्र, सोबत घेतलेले पत्र शुद्ध असले पाहिजे. मनात मंगल्भावाना धरून ‘हरी’ म्हणा रे ! ॥ध्रु.॥

 

हे वाया जाणार नाही. नाम हे उपयुक्त आहे.चार वेदांचे साक्षित्व त्यास आहे. म्हणून सर्वांनी हरिनामाचा उच्चार करावा ॥२॥

 

सर्व जगाला पोटभर पुरेल इतकी हि हरिनामाची आंबील केली आहे. क्ल्पतारुच्या सावलीखाली ती विश्रांती आहे. सर्व वर्नांनासेवान करण्या इतकी चांगली आहे. अरे, ‘हर हर महादेव’ म्हणा रे ! ॥३॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, मी दंडवत देणारा तराळ. हरिदास आहे. सर्वांना बोलावीत आहे. आपण शिखर-शिंगणापूरला जाऊन चैत्रमासातील पर्वणीच्या वेळी महादेवाचे दर्शन घेऊ ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा